Friday, May 27, 2011

गप्पां

आज मुंबईतील सुप्रसिद्ध डॉ. रवी बापट, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे
व्यवस्थापक विजय देसाई, ब्रिगेडीयर सुधीर सावंत, सुप्रसिद्ध गायिका धनश्री गणात्रा , माझे मित्र सूचित हसबनीस आणि मी.... आमची गप्पांची दिलखुलास
मैफल जमली होती..... आपल्या आयुष्यात काही दिवस रोजच्यासारखे उगवतात पण
काही कारणाने खास होऊन जातात.... अविस्मरणीय ठरतात.... आजचा दिवस
आमच्यासाठी असाच होता.....
काही व्यक्ती आपल्याला दुरूनच माहित असतात, त्यांच्याबद्दल आपण फक्त ऐकून
असतो, पण जेव्हा आपण त्यांच्या प्रत्यक्ष संपर्कात अगदी काही क्षणांपुरता
जातो तेव्हा त्यांच्या व्यक्तिमत्वाचे असंख्य पैलू आपल्याला कळतात...
डॉ. रवी बापट यांनी स्वताच्या अत्यंत खुमासदार शैलीत, मोजक्या शब्दात
काही अनुभव सांगितले आणि माणसाने स्वताच्या तत्वांशी तडजोड न करता आयुष्य
कसे जगावे हे सहजपणे सांगितले.....!!
. विजय देसाई यांचे प्रदीर्घ अनुभवातून उजळून निघालेले confident
शब्द, आणि एकदा जो निश्चय केला तो तडीस नेणे हे तत्व... त्यांच्याच
शब्दात, "एखादी गोष्ट 'उभी करायची' आहे कि 'फक्त चालवायची' आहे हे ठरवून
त्याप्रमाणे तुमचं नियोजन हवं....."
आणि ब्रिगेडीयर सावंत सरांबद्दल तर काय बोलावे !! त्यांचा करारी बाणा,
त्यांचे उमदे व्यक्तिमत्व, सखोल अभ्यास आणि तरीही अत्यंत साधेपणा मनाला
स्पर्शून गेला.....नेहमीच ...खरेय ना .ब्रिगेडीयर? हा हा हा
खरं तर आज यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मध्ये खूप महत्वाचा कार्यक्रम
होता, त्यासाठी मुख्यमंत्री आलेले होते, तरीही या मंडळींनी आम्हाला
आवर्जून वेळ दिला.... खरच, त्यांचे आभार मानण्यापेक्षा त्यांच्या ऋणातच
राहणे आम्हाला जास्त आवडेल.......!!!

No comments:

Post a Comment