शब्दांचे तडाखे देऊन ब्रम्हाचे बूड ठेचणारे संत तुकाराम महाराज! ‘आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने। शब्दांचीच शस्त्रे यत्न करूं।।’ असे म्हणत तमाम शब्दाळू सारस्वतांच्या कानाखाली आवाज काढणारे संत तुकाराम महाराज! बिनडोक पंचांग आणि माणसालाच नाकारणाऱ्या वैदिक ब्राम्हणी परंपरेवर विठोबाच्या पायाखालच्या विटा घे...ऊन प्रहार करणारे संत तुकाराम महाराज! स्वराज्यासाठी, जिजामातेच्या लाडक्या शिवबासाठी साक्षात विठ्ठलाला जाब विचारणारे संत तुकाराम महाराज! निभिर्र्ड, बंडखोर संत तुकाराम महाराज! जातीच्या अहंकारापोटी जानवेधारी शक्तींनी तुकाराम महाराजांचा खून केला आणि ते सदेह वैकुंठाला गेले अशी थाप मारली. तुकोबांची परखड संत परंपरा चालविणारा लाल त्यांच्यानंतर मात्र मराठी मातीत जन्माला आला नाही. राहिले ते फक़्त तुकोबांचे अभंग ! आजचे काही टाळकरी, वारकरी आणि पोटभरू कीर्तनकार हरी ओम, जय हरी , जय मुरारी असे काहीबाही म्हणून आपली पोटे भरतात. तुकोबांची सामाजिक प्रबोधनाची परखड आणि विद्रोही परंपरा कोणी चालविणारा आहे की नाही ? आपल्याला काय वाटते?
तुकाराम महाराज हे केवळ भक्तिमार्गी, मुमुक्षू प्रारब्धीवादी संत होते ही समजून टाकून देऊन तुकाराम हे प्रयत्नवादी, प्रबोधनवादी, समाजप्रेमी जीवननिष्ठ संत कसे होते हे समजून घेतले पाहिजे.
ReplyDeleteज्याने प्रकृती धारण केली आहे, त्याला संसार टाकता येत नाही, हे तुकाराम महाराजांना बरोबर माहीत होते. त्याचप्रमाणे 'संसाराचे अंगी अवघींच व्यसने' हेही ते जाणून होते
ReplyDeleteतुकाराम महाराजांनी आपल्या जीवनाचा ओघ उलटा फिरवला. सरळ वाहते ती धारा पण, जेव्हा ती उलटी फिरते ती राधा. संसाराकडे वाहत जाते ती धारा आणि उलटी फिरून प्रभूकडे वाहू लागते ती राधा. एकदा राधा झाल्यावर पुन्हा धारा होणे अशक्यच आहे. तुकोबारायांनी आपल्या आयुष्यातील सर्व सुखदु:खे प्रभूशी एकरूप करून टाकली. जीवनाच्या ओघात दु:ख वाटणीला आले, तर प्रभूने मला दु:ख का दिले, म्हणून माणूस आक्रोश करतो. पण जीवनभर प्रभुने जे सुख दिले, त्याचा विचार कधीच कोणी करत नाही. दु:ख देवाने दिले आणि सुख हे आपल्या कर्तृत्वाचे फळ आहे, असे माणसाला नेहमी वाटते. सुखदु:खाचा विचार करण्यापेक्षा सुखदु:खाच्या मागे कोण आहे कळल्यावर त्याची बोच आपोआपच कमी होते.
ReplyDeleteतुकाराम महाराज प्रपंचात असून नसल्यासारखे होते. ते म्हणतात : ‘प्रपंच ओसरो। चित्त तुझे पायी मुरो।’ काही जण ‘ओसरो’ शब्दाचा अर्थ ‘आटो’ असा करतात. आपण म्हणतो की आता नदीचे पाणी ओसरले, म्हणजे नदीचे पाणी आटले असे नव्हे, तर नदीचे पाणी इतपत आहे की, आपण त्यातून पलीकडच्या तीरावर जाऊ शकतो. तसे तुकाराम महाराजांनी ‘प्रपंच आटो’ असे म्हटले नाही, तर ‘प्रपंच ओसरो’ अशी ते पांडुरंगाजवळ प्रार्थना करतात. प्रपंच इतपत असावा की, ज्याच्यामधून देवाकडे येण्याला अडसर नसावा. खरे तर ज्याला पोट आहे, त्याला संसार आहे, मग तो घरात राहो अथवा मठात राहो. कारण केवळ बायकामुले एवढाच संसार नव्हे! ज्याने प्रकृती धारण केली आहे, त्याला संसार टाकता येत नाही, हे तुकाराम महाराजांना बरोबर माहीत होते. त्याचप्रमाणे ‘संसाराचे अंगी अवघींच व्यसने’ हेही ते जाणून होते. म्हणून तुकाराम महाराज प्रपंचापासून अलिप्त राहिले. याचा अर्थ बायकामुले सोडून त्यांनी काही संन्यास घेतला नाही. धोतर, अंगरखा टाकून कफनी घातली नाही अथवा लंगोटीही लावली नाही. कारण पारमाथिर्क केवळ बाह्य अंगाने संन्यास घेतात; पण वृत्ती मात्र भोगाच्या ठिकाणी अडकलेली असते. निळोबारायांनी तुकोबारायांचे आपल्या आरतीत वर्णन केले आहे, ‘प्रपंचरचना सर्वही भोगूनि त्यागिली’ त्यांनी संसारातील खते बुडवली, मात्र भिक्षा मागण्याचा उपदेश केला नाही. उलट भिक्षेचा त्यांनी निषेधच केला आहे. ते आपल्या एका अभंगात म्हणतात,
ReplyDeleteभिक्षा पात्र अवलंबणे। जळो जिणे लाजिरवाणे।।
ऐसियासी नारायणे। उपेक्षिजे सर्वथा।।
देवापायी नाही भाव। भक्ती वरीवरी वाव।।
ढोंगबाजी करीत फुकट उदरभरण करणे त्यांना नामंजूर होते.
मनाच्या अवखळ व उद्दामपणापुढे हतबल झालेले तुकाराम महाराज अगतिक होऊन विठ्ठलाला शरण जाताना म्हणतात :-
ReplyDelete‘मन माझे चपळ न राहे निश्चळ ।
घडी एकी पळ स्थिर नाही ॥
आता तू उदास नव्हे नारायण ।
धावे मज दीना गांजियेले ॥
धाव घाली पुढे इंद्रियांचे ओढी ।
केले तडातोडी चित्त माझे ॥
तुका म्हणे माझा न चले सायास ।
राहिलो मी आस धरूनी तुझी ॥
हा अभंग सोपा व सुलभ आहे. यात महाराजांची निराशा उत्कटपणे व्यक्त झाली आहे. ‘रामकृष्ण हरी’ या मंत्राचा जप करूनही मन ताळ्यावर येत नाही, म्हणून महाराज शेवटी विठ्ठलालाच शरण गेले! मन हे असे दुर्धर्ष व बलदंड असते. मनाशी दोन हात करणे हे सोपे काम नसते! फार मोठे पुण्यबळ, गुरुकृपेचे चंद्रबळ गाठी असल्याशिवाय मनोजय केवळ अशक्य!
मनाचा स्वभाव वर्णन करताना महाराज आणखी एका अभंगात म्हणतात :-
ReplyDeleteमन गुंतले लुलयां । जाय धावोनि त्या ठायां ॥
मागे परतवी तो बळी । शूर एक भूमंडळी ॥
येऊनियां घाली घाला । नेणों काय होईल तुला ॥
तुका म्हणे येणें । बहु नाडिले शाहाणे ॥
अर्थ :
मन हे विषयाच्या ठिकाणी लोलुप झाले आहे व वारंवार धावत तिकडेच जात आहे. ॥ या मनाला विषयापासून जो मागे परतवतो तोच बलाढ्य होय व या भूमंडळामध्ये तोच एक शूर आहे. ॥ हे मन ज्या वेळेस घाला घालील, त्या वेळेस तुझे काय होईल ते कळणार नाही. ॥ तुकाराम महाराज म्हणतात, आजपर्यंत या मनाने पुष्कळ शहाण्या लोकांना फसविले आहे!
लहरी मनाचे असे वर्णन केल्यानंतर आता महाराज या मनाची काकुळतीने प्रार्थना करीत आहेत :-
ReplyDeleteमना सांडिं हें वासना दु खोडी ।
मती मानसीं एक हे व्यर्थ गोडी ।
असे हीत माझें तुज काही एक ।
धरीं विठ्ठलीं प्रेम हे पायिं सुख ॥
असा सर्वभावे तुज शरण आलों ।
देह दु:ख हे भोगिता फार भ्यालों ।
भवतारिते दुसरें नाहीं कोणी ।
गुरु होत कां देव आणीक तीन्ही ॥
जनावासाना हे धना थोरि आहे ।
तुज लागली संगती तेचि सोये ।
करी सर्व संगी परित्यागु ठायी ।
तुका विनवी शीर ठेवोनि पायीं ॥
याही अभंगात महाराज मनाच्या पायावर डोके ठेवून, त्याला शरण जाऊन काकुळतीने त्याची विनवणी करीत आहेत. पांडुरंगाची कृपा होण्यासाठी तरी आधी मनाची अनुकूलताच लागते, हे ‘रहस्य’ महाराजांना कळले हेाते. सर्व प्रापंचिक दु:खाचे डोंगर पचविणारे पहाडाच्या छातीचे तुकाराम महाराज सुखासुखी मनासमोर लोटांगण घालतील काय? महाराजांची जर ही अवस्था, तर तुमचा- आमचा पाड काय लागणार या मनासमोर?
म्हणून महाराजांच्या अमर वाणीने जरी आपण या मनाची प्रार्थना केलीत तरीही मनोजय होऊ शकेल!
तुकाराम महाराज म्हणजे ब"ह्मांड उजळून टाकणारी शलाका. त्या प्रकाशात डोळे दीपतात, परंतु क्षणभर का होईना अंधारात आपण आपल्याला स्पष्ट दिसतो. हा प्रकाश दिठीमध्ये सामावला तर पावलापुरता प्रकाश सहज गवसतो. ध्येय गाठण्यासाठी तो पुरेसा असतो. वोल्होबा, कनकाईचे तुकाराम महाराज हे द्वितीय पुत्र अद्वितीय ठरले. मराठीच्या शिखरा-गोपुरामध्ये समावेश असलेले तुकारामांचे व्यक्तित्व अजोड असेच आहे. मराठी वाङ्मय विश्वात तुकारामांचे साहित्यिक स्थान अपूर्व आहे. तुकारामांच्या अभंगांची निर्मिती ही वाङ्मयीन प्रयोजन डोळ्यांसमोर ठेवून झालेली नाही. काव्य लिहिणे हे त्यांच्यासाठी महत्त्वाचे नव्हते तर जीवन जगणे, शोधणे, हेरणे हे महत्त्वाचे होतेे. त्यातूनच अभंगाची निर्मिती झाली आहे. त्यांचे जगणे हीच त्यांची अभंगवाणी. जीवनाच्या रहस्यांचा शोध घेण्याची त्यांची शक्ती सामान्य माणसात शोधूनही सापडणार नाही.
ReplyDeleteतुकारामांच्या अभंगवाणीतून त्यांचे आत्मचरित्र प्रकटले आहे. आत्मस्वीकृतीमुळे स्वत:चे दोष सांगणारे, कबूल करणारे तुकाराम महाराज सामान्य माणसाला आपल्या जवळचे वाटतात. या विभूतीच्या जसजसे आपण अभ्यास-अनुभवातून जवळ जातो तेव्हा कळते, तुकाराम महाराजांच्या मोठ्या सावलीमुळे उभे रहावे एवढीदेखील आपली मानसिक शक्ती नाही. तो आहे दिव्य प्रकाश. त्या प्रकाशाचे कवडसे म्हणजे त्यांचे अभंग. या झोतात उभे राहून क्षणकाल का होईना प्रकाशून जाता येते, हाच काय तो दिलासा आणि.... अर्थातच आनंद!
ReplyDelete" तुमचिये दासीचा दास करोनी ठेवा | आशीर्वाद द्यावा हाची मज ||
ReplyDelete