Wednesday, May 18, 2011

रामदेवच्या मुसक्या वेळीच का बंधू नयेत?

रामदेवच्या औषधाने एका महिलेचे आयुश्य बरबाद झाले. सदर महिलेने टाहो फोडूनही रामदेववादी मराठी मीडिया गप्पच आहे ! आजवर या बाजारू बाबाच्या औषधाने १५ लोकांचे बळीसुद्धा घेतले आहेत. रामदेव नावाचे एक व्यक्ती सध्या वेगवेगळ्या वाहिनींवर दिसत असतात. त्यांना लोक रामदेवबाबाही म्हणतात. त्यांचे शरीर अत्यंत लवचिक ...आहे. ते उत्तम योगासने करताना दिसतात. सुरवातीला ते वाहिन्यांवर केवळ योगासनेच करीत. भ्रामरी, कपालभाती, अनुलोम, विलोम आदी प्राणायमप्रकारांबद्दल माहिती आणि प्रात्यक्षिके देत असत. हे योगशिक्षक नंतर हळूहळू इतिहासतज्ज्ञ झाले आणि इतिहासावरही बोलायला लागले.(गौरवशाली इतिहास ते ब्रिटिशांची गुलामगिरी वगैरे वगैरे...) कालांतराने ते भाषाशास्त्राचे किती गाढे अभ्यासक आहेत हे त्यांच्या भाषणातून कळू लागले. ( म्हणजे संस्कृत ही सर्व भाषांची जननी आहे वगैरे वगैरे...)

तसे ते सुरवातीपासूनच ऍलोपथीला विरोध करायचे. (म्हणजे हे रोग म्हणजे फार्मा कंपन्यांचे कटकारस्थान. प्राणायाम केल्याने सगळे रोग छूमंतर होतात वगैरे वगैर). ते अर्थशास्त्री झाल्याचेही हल्लीच निदर्शनास आले आहे. भारताची अर्थव्यवस्था मजबूत व्हावी म्हणून अनेक उपाय सुचवत असतात. [म्हणजे काळे धन भारतात आणणे किती सोपे आहे आणि सरकारची इच्छाशक्तीच नाही. विदेशी (किंवा बहुराष्ट्रीय) कंपन्याची उत्पादने विकत घेऊ नका. बहुराष्ट्रीय कंपन्या भारतीयांना लुटताहेत वगैर वगैरे...]

कधी कधी वेळ मिळाला तर शिक्षणतज्ज्ञही असतात. (म्हणजे मॅकोलेपासून सुरवात...) ह्याशिवाय बाबाजी एक यशस्वी उद्योजकही आहेत. त्यांचे एक बिझनेस एम्पायरच आहे. पातंजली ह्या छापाखाली आयुर्वैदिक औषधांपासून, जामज्यूस ते सौंदर्यप्रसाधने अशी पातंजलीची प्रॉडक्ट रेंज आहे.
पातंजली उत्पादने
पातंजली उत्पादने


 
आयुर्वेदाचा, योगाभ्यासाचा ते प्रचार करीत असतातच. पण भारताला रोगमुक्त, सुदृढ करण्याचा वसा घेतलेल्या बाबाजींना आता राजकारणात शिरून भारताला अधिक समृद्धशाली, वैभवशाली करायचे वेध लागले आहेत.

असो. तर प्रश्न पडतो की बाबा योगशिक्षक आहेत, की भाषाशास्त्री आहेत, की अर्थशास्त्री आहेत, की शिक्षणतज्ज्ञ आहेत, की समाजसेवक आहेत की दुकानदार आहेत की राजकारणी? बाबा रामदेव आहेत तरी कोण? कुणी सांगेल का? (बाबांकडे तरी ह्या प्रश्नाचे उत्तर आहे काय?) उपक्रमी सांगतील अशी अपेक्षा आहे.

आणि असेच प्रश्न इतर बाबांबद्दल पडत असल्यास तेही सांगावे.

या बाबाच्या मुसक्या वेळीच का बंधू नयेत?

No comments:

Post a Comment