भीमगर्जना करणारा बाबासाहेबांचा आणखी एक पंथर सत्तेसाठी लाचार होउन भगव्या भानामतीच्या भुताच्या आश्रयाला गेला आहे. रिडल्स इन हिंदूइझमपासून खैरलांजीर्पयतच्या टोकाच्या संघर्षाची परंपरा असतानाही रामदास आठवले मातोश्रीवर जाऊन बेशरमपणे शिवशक्ती-भीमशक्तीचे एकत्रीकरण अशी भावनिक भाषा करतो हे आंबेडकरी चळवळीचे सर्वात मोठे दुर्दैव! नामदेव ढसाळ यांच्यासारखा खमका माणूस ज्या पद्धतीने शिवसेनेने कुजवला त्याच दिशेने आता रामदास आठवले निघाले आहेत. शिवसेनेला सत्तेचे तुकडे आणि मिरवण्यासाठी दलित चेहरे हवे असताना रामदास यांच्यासारखा विचारांची पक्की बैठक नसलेला माणूस त्यांच्या गळाला लागला यात तसे फारसे नवल नाही. महाराष्ट्राच्या राजकारणात आठवले हे शरद पवार यांचे विश्वासू म्हणूनच आजवर वावरले आहेत. शरद पवार यांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे दिलदार शत्रू मानतात..काल त्यांनी तसे पुन्हा एकदा आठवले यांच्या उपस्थितींत बोलून दाखविले आणि आठवले गालातल्या गालात हसले. काय म्हणावे या बौद्धिक दिवाळखोरीला? आठवले आता आपली प्रतिमा रेटण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहेत. आठवले यांची एकूण कार्यशैली आणि वागणे-बोलणे यामुळे त्यांना राजकारणात कुणी गंभीरपणे घेत नाही. आठवले यांच्यामागे भीमशक्ती आहे, हाच मुळात एक मोठा विनोद आहे. असो.
दलित चळवळीचे आधीच तीनतेरा वाजलेले आहेत. अॅड. प्रकाश आंबेडकर यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू म्हणून एक वेगळी मान्यता असली तरीही त्यांची भूमिका नेहमी संशयास्पद राहिली आहे. नामदेव ढसाळ, राजा ढाले, टी. एम. कांबळे,सुलेखा कुंभारे वगैरे नावे मोठी दिसत असली तरीही त्यांच्यामागे राजकीय ताकद नसल्यामुळे ते कुठे आहेत याला काही अर्थ उरत नाही. राज्यपाल पद घेऊन गवई कधीच काँग्रेसचे बटिक झाले आहेत. कवाडे सध्या कमळाभोवती पिंगा घालत आहेत. महाराष्ट्रातील दलितांच्या नेतृत्वासंदर्भात काँग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी यांनी सूचक विधान केले असले तरी काँग्रेसमधून दलितांसाठी नेतृत्व उभे राहणे नजिकच्या काळात तरी शक्य नाही. सध्या जे दलित नेते आहेत ते नेमके कुठे आहेत हे त्यांना स्वताच माहित नाही. नवे नेतृत्वही उभे राहताना दिसत नाही. तूर्त तरी रामदास आठवले यांनी आत्मघात ओढून घेतला आहे असेच म्हणावे लागेल!!! रामदास रामदासी झाले हेच खरे !

No comments:
Post a Comment