Saturday, May 28, 2011

बाळ गंगाधर टिळक"लोकमान्य" नाहीच!

बाळ गंगाधर टिळक हे खरेच "लोकमान्य" होते का? इतिहासाची पाने तर काही वेगळेच सांगतात. टिळकांनी देशसेवेचा चक्क धंदा केला. टिळक हे अत्यंत गरीब होते . जत्रेत टिळा लाऊन त्यांचे पूर्वज गुजराण करत त्यावरून त्यांचे नाव टिळक पडले. कर्मदरिद्री टिळक जनतेची संपत्ती हडप करून अब्जोपती झाले.. टिळक मेले त्यावेळी कुटुंबासाठी अब्जावधीची संपत्ती सोडून गेले. टिळकांचे नातू जयवंत टिळक यांनी "मी जयवंत टिळक " या पुस्तकात संपतीचा तपशील दिला आहे." लोकमान्यांनी आपल्या मृत्युपत्रानुसार आपला वाडा, सिंहगडावरील बंगला, लातूरची जिनिंग, गीता रहस्याचे हक्क, विम्याचे पैसे, भरपूर दागिने वगैरे मालमत्ता मुलांना दिली होती. वाड्यातील केसरीच्या भागाचे भाडे ,विम्याचे पैसे या खेरीज आपल्या मुलांना दरमहा २०० रुपये मिळतील अशी सोय केली होती"

महाराज सयाजीराव गायकवाड यांनी राहायला दिलेला गायकवाड वाडा टिळकांनी हडपला. वर्तमान वारसदारांनी त्याचे नाव बदलून टिळक वाडा असे केले आहे .तानाजी मालुसरे या मर्द मावळ्याने बलिदान देऊन सिंहगड जिंकला त्यांचे वंशज आज गडावर ताक आणि दही विकून जगतात.टिळकचा बंगला सिंहगडावर आहे. 

जनतेची संपती हडप करणारा , वैदिक ब्राम्हणी परंपरेचा कट्टर पुरस्कर्ता असलेला, शिवरायांची टिंगल करणारा, स्त्री शिक्षणाच्या विरोधात असलेला बाळ गंगाधर टिळक कोणी "लोकमान्य" ठरविला ? या टिळकाचा असली चेहरा का समोर आला नाही? याच टिळकाने"कुणबटांना लोकसभेत नांगर हाकायचं काय? वाण्यांना काय तागडी धरायची काय? माळ्यांना काय फुल लावायची काय?" असे प्रश्न विचारले होते. परंतु आपल्या अभ्यासक्रमात त्याच्या बद्दल "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळविणारच" हे शिकविले जाते. तो कोणाच्या स्वराज्याची मागणी करीत होता हे यातून स्पष्ट होते. प्रबोधनकारांनी तर या टिळकला चक्क कुत्रे म्हटले आहे . पहा काय म्हणतात प्रबोधनकार . "ज्यांना ज्यांना हरिभक्तपरायण ठरविले ते ह.भ.प. मग ते शुक्रवारपेठेत त्रिकाळ फेरफटका करणारे वारयोशिता परायण असले, तरी त्याबद्दल कोणी ब्र ही काढता कामा नये. त्यांनी एखाद्याला देशभक्त ठरवल्याशिवाय तो दे.भ. असणे किंवा होणेच शक्य नाही; मग जातीने तो कितीही नीच दानतीचा आणि कवडीमोल अकलेचा असला तरी हरकत नाही. जसे किस्ती होण्यासाठी जार्डन नदीच्या पाण्याचा "कुरूस" छातीवर व टाळक्यावर पाद्री भटाच्या हातून काढून घ्यावा लागते, त्याप्रमाणे ज्याला देशभक्त व्हायचे असेल त्याने पुण्याच्या राष्ट्रीय शुक्रवार क्लबच्या थालेपीठ भजांची दीक्षा घेऊन महिना पंधरा दिवस तेथील कचोपकचांची शागिर्दी केली कि बस्स ! तत्काळ तो दे. भ. बनतो. विद्वतेची, देशभक्तीची, सुधारणेची वैगरे सर्व गोष्टींची ताम्रपते येथून मिळाल्याशिवाय जगात- म्हणजे महाराष्ट्रात कोणीही मानवाचा कारटा विद्वान देशभक्त आणि निष्काम कर्मयोगी निपजुच शकायचा नाही. असा एक अलिखित कायदा झाला आहे. या कायद्याला विरोध करून कोणी आपली स्वतंत्र बाण्याची मते प्रतिपादन करू लागला तर त्याचे वाभाडे काढायला आमचे "पुणेकर केसरी" महाराजसुद्धा आपले सिंहाचे भाडोत्री कातडे व मुखवटा पार फेकून देऊन, लूत लागून पिसाळलेल्या कुत्र्यासारखे भुंकू लागतात. मग त्यांच्या प्रभावलीतल्या पोसलेल्या गर्दभांच्या लाथा दुगाण्यांचा खडखडाट आणि धडपडाट काय वर्णन करा? स्वतःच्या हातात दर्भाइन काही सत्ता नसताना हे भिशुकशाहीचे पुणेरी भूत आपल्या राष्ट्रीय गुंडगिरीचा धिंगाणा घालताना जर ढुंगणाचे सोडून डोक्याला गुंडाळायला कमी करीत नाही, तर उद्या खऱ्याखोट्या लोकशाहीच्या कॉन्सिलात यांच्या प्राबल्याची शीग जर उंची वर चढली तर ते सर्वांच्या डोक्यावर मिरे वाटून विसाव्या शतकात पुनश्च पेशवाई पाट्यावरवांठ्याचा जीर्णोद्धार कशावरून करणार नाहीत, याची हमी कोणत्या विमा कंपनीने घेतली आहे ? (भिशुक शाहीचे बंड मूळ आवृत्ती पृष्ठ ५० - ५१ )

No comments:

Post a Comment