खोटारडे शिवसेनाप्रमुख :
सोबतीला असताना सत्त्तेचे भोगदास
कशाला हवे बाबासाहेबांचे रामदास?
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे चक्क थापाडे आहेत. अंगावर भगवे कपडे आणि गळ्यात किलोभर रुद्राक्षांच्या माळा घालणाऱ्या बाळासाहेबांनी या वयात खोटे बोलावे यापेक्षा मोठे दुर्दैव त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या शिवसैनिकांचे असू शकत नाही. खरोखर प्रबोधनकार आज असते तर त्यांनी सरळ साहेबांच्या कानाखालीच वाजवली असती कारण साहेबांनी खोटे बोलण्याचा महाप्रताप केला आहे. अज्ञान म्हणा, अडाणीपणा म्हणा किंवा जाणूनबुजून म्हणा, पण मराठवाडा विद्यापीठ नामांतराचा विषय सतत उकरून काढला जातो. आज मी पुन्हा निक्षून सांगतो, की मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरास मी कधीच विरोध केला नव्हता,अशी मुक्ताफळे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी उधळली आहेत. मराठवाडा हे नाव कायम ठेवून सध्या दिलेले नाव ही मूळ आपली कल्पना होती अशी थापही साहेबांनी मारली आहे.
नामांतराला शिवसेनेचा कडाडून विरोध होता. स्वत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे जळजळीत शब्दांमध्ये नामांतराची म्हणजेच बाबासाहेब आंबेडकर यांची खिल्ली उडवत होते. सामना दैनिकाचे मागील अंक बाळासाहेबांनी चाळले तर तेच तोंडघशी पडतील. घरात नाही पीठ, कशाला हवे विद्यापीठ ? असे खुद्द बाळासाहेबांनी म्हटले होते. मराठवाड्यात जागोजागी शिवसैनिकांनी या घोषणेचे फलक लाऊन हाणा, मारा, पकडा, पेटवा, माजलेत साले म्हणत शेकडो दलितांच्या झोपड्या पेटविल्या होत्या. हे बाळासाहेब सपशेल विसरले आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव मराठवाडा विद्यापीठास द्यावे म्हणून परिवर्तनवादी चळवळीने सलग १७ वर्षे जो लढा दिला तो खरे तर मानसिक परिवर्तनाचा लढा होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, प्रकांड पंडित, महान ज्ञानर्षी, शिवाय बाबासाहेबांनी औरंगाबाद येथे १९५० साली मिलिंद महाविद्यालयाची स्थापना करून शैक्षणिकदृष्टय़ा मागासलेल्या मराठवाडय़ात उच्च शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवलेली. तेव्हा बाबासाहेबांसारख्या महान ज्ञानयोग्याचे नाव मराठवाडा विद्यापीठास देऊन बाबासाहेबांची नव्हे तर विद्यापीठाची उंची वाढवावी अशी साधी, सरळ नि स्वच्छ मागणी परिवर्तनवाद्यांनी केली आणि सनातनी- सवर्ण- प्रतिगामी नामांतरविरोधकांचा मस्तकशूळ उठला. मराठवाडय़ातील काँग्रेसमधील मराठय़ांनी नामांतरास विरोध करणे समजू शकत होते. शिवसेनेने ‘ज्यांच्या घरात नाही पीठ त्यांना कशाला हवे विद्यापीठ?’ असा खुनशी नि तुच्छतादर्शक प्रश्न विचारणे कळण्यासारखे होते. पण उठता बसता बाबासाहेबांचा उदोउदो करणारे व स्वत:ला समाजवादी म्हणविणारे नामांतराच्या विरोधात गेले तेव्हा ते खरे धक्कादायक होते.
नामांतरविरोधकांची भूमिका अशी होती की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विद्वत्तेविषयी, त्यांच्या कार्य-कर्तृत्वाविषयी आम्हाला आदर आहे. पण मराठवाडय़ाची अस्मिताही थोर आहे म्हणून नामांतरास आमचा विरोध आहे. तथाकथित प्रादेशिक अस्मितेच्या आड दडून ज्यांनी नामांतरास विरोध केला ते हे मात्र सोयीस्करपणे विसरले की, बाबासाहेबांनी हैदराबादच्या निजामास विरोध करून हैदराबाद संस्थान भारतात विलीन व्हावे, अशीच भूमिका घेतली होती. वल्लभभाई पटेल यांनी हैदराबाद संस्थानात पोलिस कारवाई करताना बाबासाहेबांशी विचारविमर्श केलेला होता. दलित समाजाने निजामाच्या भूलथापांना बळी पडून इस्लाम धर्म स्वीकारू नये, असेही बाबासाहेबांनी संस्थानातील अस्पृश्यांना बजावले होते. बाबासाहेबांनी १९३५ साली जेव्हा धर्मातराची घोषणा केली होती तेव्हा निजामाने, बाबासाहेबांनी आपल्या अनुयायांसह इस्लाम धर्म स्वीकारावा, त्यांच्या समाजाच्या उन्नतीसाठी आपण आर्थिक निधी उभारू, असे म्हटले होते. पण बाबासाहेबांनी निजामाचा हा देकार धुडकावून लावला होता. तात्पर्य बाबासाहेब भारतीय संघराज्याशी आणि मराठवाडय़ाशी इमान राखून होते. तरीही नामांतरविरोधकांनी तथाकथित प्रादेशिक अस्मितेच्या आड दडून नामांतरास विरोध केला, याचा अर्थच नामांतरविरोधकांची भूमिका छुप्या जातीय मनोवृत्तीने बरबटलेली होती. नामांतरविरोधक तेव्हा असा अपप्रचार करीत होते की, नामांतर झाले तर बौद्ध विद्यापीठ होईल. महार आंबेडकरांच्या नावाच्या पदव्या आपल्या घरातील भिंतीवर टांगाव्या लागतील. ही जातीय मनोवृत्ती नव्हती तर दुसरे काय होते?
नामांतराची किमंत अर्थातच शरद पवार यांना चुकवावी लागली.२७ जुलै १९७८ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांच्या पुलोद सरकारने विधिमंडळाच्या उभय सभागृहांत नामांतराचा ठराव संमत केला होता. रदीर्घ संघर्षांनंतर १४ जानेवारी १९९४ रोजी शरद पवारांच्याच मुख्यमंत्रिपदाच्या काळात एका विद्यापीठाची दोन विद्यापीठे होऊन औरंगाबादच्या विद्यापीठास डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव जोडण्यात आले. याचाच परिणाम म्हणून शरद पवार यांना १९९५ ची विधानसभा निवडणुकीत पराभव पत्करावा लागला होता. पण याचे श्रेय कधीच त्यांना दिले गेलेले नाही.
मराठवाडय़ात शिवसेनेने नामांतर विरोधात विष पेरले होते ...एकच आगडोंब उसळला होता. खेडोपाडी दलितांच्या झोपडय़ांची राखरांगोळी करण्यात आली. त्यांना अमानुष मारहाण करण्यात आली. काहींचे मुडदे पाडण्यात आले. नामांतरासाठी काहींनी आत्मदहन केले. या नृशंस अत्याचारामागे दडले होते नामांतरविरोधकांचे बुरसटलेले जातीय मन. दलितांच्या स्पर्शाने हुतात्मा चौक बाटला अशी आरोळी ठोकून त्याचे गोमुत्राने शुद्धीकरण करणारे बाळासाहेब आणि शिवसैनिक हा रक्ताचा इतिहास कसा नाकारू शकतात? सोबतीला असताना सत्त्तेचे भोगदास , कशाला हवे बाबासाहेबांचे रामदास? असा जाब बाळासाहेबांच्या मांडीवर जाऊन बसलेले रामदास आठवले का विचारत नाहीत?

No comments:
Post a Comment