Friday, May 27, 2011

बाळासाहेबांच्या लाडक्या सूनबाई निघाल्या ‘बाबरी’ बनवायला !!



शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आपल्या स्वताच्या घराला सांभाळू शकलेले नाहीत . कुठे राज तर कुठे स्मिता . कुठे जयदेव तर कुठे रमेश ठाकरे..कुणाचा पायपोस कुणात नाही ! ते असो, तर आता बाळासाहेबांच्या लाडक्या सूनबाई ‘बाबरी’ बनवायला निघाल्या आहेत, बाबरी पाडायला गेलेल्या शिवसैनिकांचे जा...हीर अभिनंदन करणा-या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची सून, सिनेनिर्मात्या स्मिता ठाकरे या आता ‘ बाबरी ’ नावाचा सिनेमा काढणार आहे. मात्र बाबरीविषयी शिवसेना आणि बाळासाहेबांची भूमिका मांडणारा हा सिनेमा नसेल असं स्मिता ठाकरे यांनी स्पष्ट केलय.
६ डिसेंबर ९२ रोजी बाबरी पाडल्यानंतर भारतीय समाज आणि राजकारणाला ढवळून निघाला. मुंबईसह देशभरात अनेक ठिकाणी दंगेधोपे झाले. हजारो माणसं मारली गेली. अनेकांचे संसार उध्वस्त झाले. देश ढवळून काढणारा बाबरी कांड हा नंतर रुपेरी पडद्याचाही विषय झाला. बाबरी कांडाची पार्श्वभूमी असलेले ‘ बॉम्बे ’ आणि ‘ ब्लॅक फ्रायडे ’ हे सिनेमे विशेष लोकप्रिय ठरले. मात्र या सिनेमांना अनेक वादाचा सामना करावा लागला होता.
या सिनेमामुळे जखमांवरच्या खपल्या उसवल्या जाणार नाहीत का? प्रेतांच्या ढीगारावर बसून लोकां/चे मनोरंजन करण्याची ठाकरे घराण्याची हौस कधी भागेल कोणास ठाऊक ? आपल्याला काय वाटते ?

No comments:

Post a Comment