Thursday, May 5, 2011

आता रामदेवचेही उपोषण!!!

योगात योग की नुसताच योगायोग? छू मंतर...जंतर मंतर...छू मंतर...धोतरावाल्या अण्णांचे उपोषण झाले आता भगव्या लुंगीवाल्या रामदेवचे उपोषण..!!! आता पुन्हा मेणबत्त्या...उदबत्त्या..आणि ब्रेंकिंग न्यूज!!! पळा पळा दिल्लीला पळा!!! एक नाकपुडी दाबून दुसऱ्या नाकपुडीतून हवा सोडणारा रामदेव डोळे मीचकत कधी अब्जोपती झाला आणि कधी रा...जकारणात येऊन नेता झाला कळलेच नाही. लोकांना कर्मकांडे आणि योगाच्या भजनी लाऊन हा बाबा ८० हजार कोटीचा मालक झाला. देशी देशी करता करता लुंगी सावरत हा बाबा थेट विदेशात हजारो कोटी रुपयांची गुंतवणूक करून आला. लोक लागले एक नाकपुडी दाबून दुसऱ्या नाकपुडीतून हवा सोडायला ...पोट वाकडेतिकडे फिरवायला ...बाबाचा नवाच धंदा...सत्यसाईसारखा....१०० रुपये कमवायचे ..२५ रुपयांची लोकांना दाखविण्यासाठी सामाजिक कामे दाखवायची आणि ७५ रुपये खिशात घालायचे...पाहता पाहता रामदेव ८० हजार कोटींचा मालक झाला...नेता पण झाला...आता या बाबाने ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांचे अनुकरण करीत उपोषणचा मार्ग अवलंबिण्याचे ठरविले आहे. स्वीस बँकेतील काळा पैसा भारतात परत आणावा आणि या बँकेतील खातेधारकांची नावे जाहीर करावीत, या मागण्यांसाठी रामदेव येत्या ४ जूनपासून दिल्लीतील रामलीला मैदानावर आमरण उपोषणाला बसणार आहे. स्वीस बँकेत असलेला काळा पैसा आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात तातडीने पावले उचलण्यास केंद्र सरकारला भाग पाडण्यासाठी आपण उपोषणाच्या मार्गाचा अवलंब केल्याचे रामदेवने सांगितले. भ्रष्टाचारी नेते व अधिकाऱ्यांना फाशीच्या शिक्षेची तरतूद लोकपाल विधेयकात करावी, अशी आग्रही त्याने केली. देशविदेशातील आपले असंख्य पाठीराखेही उपोषणाला बसणार असल्याचे सांगून रामदेव म्हणाला की, चलनात असलेल्या ५०० आणि १००० रुपयांच्या नोटांमुळे भ्रष्टाचार होतो त्यामुळे या मोठय़ा नोटांवर बंदी घालण्यात यावी. आपल्या उपोषणात सहभागी होण्यासाठी बाबा रामदेव यांनी अण्णा हजारे, किरण बेदी, न्या. हेगडे यांनाही निमंत्रित केले आहे. आता पुन्हा टीव्हीवाल्यांची चंगळ..ब्रेंकिंग न्यूजचा भडीमार...आजतकवाले चावला जाऊन बसतील रामदेवच्या मांडीवर...राडियाबाईसोबत पोलिटीकल फिक्सिंग करणारे वीर संघवी आणि बरखा दत्तंबाईला रामदेवचा पुळका येईल. दर्डासेठ, पत्रकारिता कोणी कुणाला शिकवायची? असा एकेकाळी सवाल करणारे आणि आता त्याच दर्डासेठची चाकरी करणारे निखीलपंत वागळे महाचर्चा घडउन आणतील...बाकीच्या लीम्बुतींबू वाहिन्या पण लिंबूमिरची लाऊन रामदेवच्या उपोषणाची महती गातील. अरे चाललेय काय आपल्या देशात? आपल्याला काय वाटते?

No comments:

Post a Comment