सचिन तेंडूलकर बिघडलाय...अकलेचा पार भुगा झालाय त्याच्या .....अनेक आरोप असलेल्या आपल्या आध्यात्मिक गुरू सत्य साईबाबा यांच्या संगमरवरी पुतळ्याचा खर्च करण्याचा निर्णय मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने घेतला आहे. त्यासाठी सचिनने प्रशांती निलयम आश्रमाला ३० लाख रुपये दिले असून पुतळ्याला सोन्याचा मु...लामा देण्याची जबाबदारीही स्वीकारली आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर हा सत्य साईबाबांचा भक्त आहे. सचिनच्या वाढदिवशी म्हणजे २४ एप्रिललाच सत्य साईबाबांचे निधन झाले. आयपीएलच्या भरगच्च वेळापत्रकातून वेळ काढून दुसऱ्याच दिवशी सचिन पुट्टपर्थीला पोहोचला आणि पत्नी अंजलीसह सत्यसाईंच्या पार्थिवाचे दर्शन घेतले. तिथे सचिनला अश्रू अनावर झाले होते. सचिनच्या काही चाहत्यांना त्याचे हे वागणे खटकले होते; पण सचिनची सत्यसाईंवर नितांत श्रद्धा असल्याने त्याने याबाबतच्या उलटसुलट चर्चांकडे दुर्लक्ष केले. आता तर तो सत्यसाईंच्या भव्य पुतळ्याचा खर्च करणार आहे. वाह सचीनदेवा!!! जादूटोणा करणारा बाबा तू हुतात्मा ठरविलास!!! धन्य आहे सचिन तुझी....सचिनच्या तमाम चाहत्यांनी आता सचिनला गळ घातली पाहिजे की, त्याने या जादूटोणाबाबाचा पुतळा आपल्या महाराष्ट्रात बसवावा....बाबाच्या पुतळ्यावर एक मेणबत्ती तेवत ठेवावी...बाबाचे चमत्कारच महान....अख्खा महाराष्ट्र उजळून निघेल...मेणबत्ती कधी विझणारच नाही...महाराष्ट्रातले लोडशेडिंग एकदम खल्लास होईल...इतकेच काय पाकिस्तानात दडून बसलेला दाउद फरपटत भारतात येईल....अंबानी बाबाची मुंबई इंडिअन टीम कधीच हरणार नाही...सचिन आहेच ग्रेट...त्याहून साईबाबा ग्रेट ...आणि तुम्ही आम्ही सगळेच ग्रेट!!! देऊन टाका सचिनला भारतरत्न ...साईबाबाला पण द्या...ज्याला पाहिजे त्याला देऊन टाका भारतरत्न...जय सचीनदेवा!!! जय जादूटोणाबाबा!!!!!
No comments:
Post a Comment