Thursday, May 19, 2011

खोटारडे शिवसेनाप्रमुख : सोबतीला असताना सत्त्तेचे भोगदास कशाला हवे बाबासाहेबांचे रामदास?

खोटारडे शिवसेनाप्रमुख :
सोबतीला असताना सत्त्तेचे भोगदास
कशाला हवे बाबासाहेबांचे रामदास?

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे चक्क थापाडे आहेत. अंगावर भगवे कपडे आणि गळ्यात किलोभर रुद्राक्षांच्या माळा घालणाऱ्या बाळासाहेबांनी या वयात खोटे बोलावे यापेक्षा मोठे दुर्दैव त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या शिवसैनिकांचे असू शकत नाही. खरोखर प्रबोधनकार आज असते तर त्यांनी सरळ साहेबांच्या कानाखालीच वाजवली असती कारण साहेबांनी खोटे बोलण्याचा महाप्रताप केला आहे. अज्ञान म्हणा, अडाणीपणा म्हणा किंवा जाणूनबुजून म्हणा, पण मराठवाडा विद्यापीठ नामांतराचा विषय सतत उकरून काढला जातो. आज मी पुन्हा निक्षून सांगतो, की मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरास मी कधीच विरोध केला नव्हता,अशी मुक्ताफळे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी उधळली आहेत. मराठवाडा हे नाव कायम ठेवून सध्या दिलेले नाव ही मूळ आपली कल्पना होती अशी थापही साहेबांनी मारली आहे.
नामांतराला शिवसेनेचा कडाडून विरोध होता. स्वत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे जळजळीत शब्दांमध्ये नामांतराची म्हणजेच बाबासाहेब आंबेडकर यांची खिल्ली उडवत होते. सामना दैनिकाचे मागील अंक बाळासाहेबांनी चाळले तर तेच तोंडघशी पडतील. घरात नाही पीठ, कशाला हवे विद्यापीठ ? असे खुद्द बाळासाहेबांनी म्हटले होते. मराठवाड्यात जागोजागी शिवसैनिकांनी या घोषणेचे फलक लाऊन हाणा, मारा, पकडा, पेटवा, माजलेत साले म्हणत शेकडो दलितांच्या झोपड्या पेटविल्या होत्या. हे बाळासाहेब सपशेल विसरले आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव मराठवाडा विद्यापीठास द्यावे म्हणून परिवर्तनवादी चळवळीने सलग १७ वर्षे जो लढा दिला तो खरे तर मानसिक परिवर्तनाचा लढा होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, प्रकांड पंडित, महान ज्ञानर्षी, शिवाय बाबासाहेबांनी औरंगाबाद येथे १९५० साली मिलिंद महाविद्यालयाची स्थापना करून शैक्षणिकदृष्टय़ा मागासलेल्या मराठवाडय़ात उच्च शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवलेली. तेव्हा बाबासाहेबांसारख्या महान ज्ञानयोग्याचे नाव मराठवाडा विद्यापीठास देऊन बाबासाहेबांची नव्हे तर विद्यापीठाची उंची वाढवावी अशी साधी, सरळ नि स्वच्छ मागणी परिवर्तनवाद्यांनी केली आणि सनातनी- सवर्ण- प्रतिगामी नामांतरविरोधकांचा मस्तकशूळ उठला. मराठवाडय़ातील काँग्रेसमधील मराठय़ांनी नामांतरास विरोध करणे समजू शकत होते. शिवसेनेने ‘ज्यांच्या घरात नाही पीठ त्यांना कशाला हवे विद्यापीठ?’ असा खुनशी नि तुच्छतादर्शक प्रश्न विचारणे कळण्यासारखे होते. पण उठता बसता बाबासाहेबांचा उदोउदो करणारे व स्वत:ला समाजवादी म्हणविणारे नामांतराच्या विरोधात गेले तेव्हा ते खरे धक्कादायक होते.
नामांतरविरोधकांची भूमिका अशी होती की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विद्वत्तेविषयी, त्यांच्या कार्य-कर्तृत्वाविषयी आम्हाला आदर आहे. पण मराठवाडय़ाची अस्मिताही थोर आहे म्हणून नामांतरास आमचा विरोध आहे. तथाकथित प्रादेशिक अस्मितेच्या आड दडून ज्यांनी नामांतरास विरोध केला ते हे मात्र सोयीस्करपणे विसरले की, बाबासाहेबांनी हैदराबादच्या निजामास विरोध करून हैदराबाद संस्थान भारतात विलीन व्हावे, अशीच भूमिका घेतली होती. वल्लभभाई पटेल यांनी हैदराबाद संस्थानात पोलिस कारवाई करताना बाबासाहेबांशी विचारविमर्श केलेला होता. दलित समाजाने निजामाच्या भूलथापांना बळी पडून इस्लाम धर्म स्वीकारू नये, असेही बाबासाहेबांनी संस्थानातील अस्पृश्यांना बजावले होते. बाबासाहेबांनी १९३५ साली जेव्हा धर्मातराची घोषणा केली होती तेव्हा निजामाने, बाबासाहेबांनी आपल्या अनुयायांसह इस्लाम धर्म स्वीकारावा, त्यांच्या समाजाच्या उन्नतीसाठी आपण आर्थिक निधी उभारू, असे म्हटले होते. पण बाबासाहेबांनी निजामाचा हा देकार धुडकावून लावला होता. तात्पर्य बाबासाहेब भारतीय संघराज्याशी आणि मराठवाडय़ाशी इमान राखून होते. तरीही नामांतरविरोधकांनी तथाकथित प्रादेशिक अस्मितेच्या आड दडून नामांतरास विरोध केला, याचा अर्थच नामांतरविरोधकांची भूमिका छुप्या जातीय मनोवृत्तीने बरबटलेली होती. नामांतरविरोधक तेव्हा असा अपप्रचार करीत होते की, नामांतर झाले तर बौद्ध विद्यापीठ होईल. महार आंबेडकरांच्या नावाच्या पदव्या आपल्या घरातील भिंतीवर टांगाव्या लागतील. ही जातीय मनोवृत्ती नव्हती तर दुसरे काय होते?
नामांतराची किमंत अर्थातच शरद पवार यांना चुकवावी लागली.२७ जुलै १९७८ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांच्या पुलोद सरकारने विधिमंडळाच्या उभय सभागृहांत नामांतराचा ठराव संमत केला होता. रदीर्घ संघर्षांनंतर १४ जानेवारी १९९४ रोजी शरद पवारांच्याच मुख्यमंत्रिपदाच्या काळात एका विद्यापीठाची दोन विद्यापीठे होऊन औरंगाबादच्या विद्यापीठास डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव जोडण्यात आले. याचाच परिणाम म्हणून शरद पवार यांना १९९५ ची विधानसभा निवडणुकीत पराभव पत्करावा लागला होता. पण याचे श्रेय कधीच त्यांना दिले गेलेले नाही.

मराठवाडय़ात शिवसेनेने नामांतर विरोधात विष पेरले होते ...एकच आगडोंब उसळला होता. खेडोपाडी दलितांच्या झोपडय़ांची राखरांगोळी करण्यात आली. त्यांना अमानुष मारहाण करण्यात आली. काहींचे मुडदे पाडण्यात आले. नामांतरासाठी काहींनी आत्मदहन केले. या नृशंस अत्याचारामागे दडले होते नामांतरविरोधकांचे बुरसटलेले जातीय मन. दलितांच्या स्पर्शाने हुतात्मा चौक बाटला अशी आरोळी ठोकून त्याचे गोमुत्राने शुद्धीकरण करणारे बाळासाहेब आणि शिवसैनिक हा रक्ताचा इतिहास कसा नाकारू शकतात? सोबतीला असताना सत्त्तेचे भोगदास , कशाला हवे बाबासाहेबांचे रामदास? असा जाब बाळासाहेबांच्या मांडीवर जाऊन बसलेले रामदास आठवले का विचारत नाहीत?

Wednesday, May 18, 2011

काठी न् घोंगडं

शाम, आज तुझा वाढदिवस! खूप आठवणी दाटून आल्यात रे ! आणि तू सुद्धा जवळ नाहीस. आज तुझ्या माझ्या आवडीचे एक गाणे शेअर करतोय ... मला वाटते आपले बालपण आणि अनेक आठवणी या गाण्यात आहेत. काठी न् घोंगडं घेऊ द्या कि रं...मला बी जत्रला येऊ द्या की...आठवतेय रे सारे .....

jeena yaha marna yaha~mera naam joker

Jeena Yahan Marna Yahan, Iske Siva Jaana Kahan Ji Chahe Jab Humko Awaaz Do Hum Hain Wahin Hum Thhe Jahan, Apne Yahin Dono Jahan Iske Siva Jana Kahan Jeena Yahan ...... Yeh Mera Geet Jeevan Sangeet Kal Bhi Koi Dohrayega Jag Ko Hasane Bahrupiya Roop Badal Phir Aayega Swarg Yahin Nark Yahan Iske Siva Jana Kahan Jeena Yahan ...... Kal Khel Mein Hum Ho Na Ho Gardish Mein Taare Rahenge Sada Bhoolenge Hum Bhoologe Tum Par

रामदेवच्या मुसक्या वेळीच का बंधू नयेत?

रामदेवच्या औषधाने एका महिलेचे आयुश्य बरबाद झाले. सदर महिलेने टाहो फोडूनही रामदेववादी मराठी मीडिया गप्पच आहे ! आजवर या बाजारू बाबाच्या औषधाने १५ लोकांचे बळीसुद्धा घेतले आहेत. रामदेव नावाचे एक व्यक्ती सध्या वेगवेगळ्या वाहिनींवर दिसत असतात. त्यांना लोक रामदेवबाबाही म्हणतात. त्यांचे शरीर अत्यंत लवचिक ...आहे. ते उत्तम योगासने करताना दिसतात. सुरवातीला ते वाहिन्यांवर केवळ योगासनेच करीत. भ्रामरी, कपालभाती, अनुलोम, विलोम आदी प्राणायमप्रकारांबद्दल माहिती आणि प्रात्यक्षिके देत असत. हे योगशिक्षक नंतर हळूहळू इतिहासतज्ज्ञ झाले आणि इतिहासावरही बोलायला लागले.(गौरवशाली इतिहास ते ब्रिटिशांची गुलामगिरी वगैरे वगैरे...) कालांतराने ते भाषाशास्त्राचे किती गाढे अभ्यासक आहेत हे त्यांच्या भाषणातून कळू लागले. ( म्हणजे संस्कृत ही सर्व भाषांची जननी आहे वगैरे वगैरे...)

तसे ते सुरवातीपासूनच ऍलोपथीला विरोध करायचे. (म्हणजे हे रोग म्हणजे फार्मा कंपन्यांचे कटकारस्थान. प्राणायाम केल्याने सगळे रोग छूमंतर होतात वगैरे वगैर). ते अर्थशास्त्री झाल्याचेही हल्लीच निदर्शनास आले आहे. भारताची अर्थव्यवस्था मजबूत व्हावी म्हणून अनेक उपाय सुचवत असतात. [म्हणजे काळे धन भारतात आणणे किती सोपे आहे आणि सरकारची इच्छाशक्तीच नाही. विदेशी (किंवा बहुराष्ट्रीय) कंपन्याची उत्पादने विकत घेऊ नका. बहुराष्ट्रीय कंपन्या भारतीयांना लुटताहेत वगैर वगैरे...]

कधी कधी वेळ मिळाला तर शिक्षणतज्ज्ञही असतात. (म्हणजे मॅकोलेपासून सुरवात...) ह्याशिवाय बाबाजी एक यशस्वी उद्योजकही आहेत. त्यांचे एक बिझनेस एम्पायरच आहे. पातंजली ह्या छापाखाली आयुर्वैदिक औषधांपासून, जामज्यूस ते सौंदर्यप्रसाधने अशी पातंजलीची प्रॉडक्ट रेंज आहे.
पातंजली उत्पादने
पातंजली उत्पादने


 
आयुर्वेदाचा, योगाभ्यासाचा ते प्रचार करीत असतातच. पण भारताला रोगमुक्त, सुदृढ करण्याचा वसा घेतलेल्या बाबाजींना आता राजकारणात शिरून भारताला अधिक समृद्धशाली, वैभवशाली करायचे वेध लागले आहेत.

असो. तर प्रश्न पडतो की बाबा योगशिक्षक आहेत, की भाषाशास्त्री आहेत, की अर्थशास्त्री आहेत, की शिक्षणतज्ज्ञ आहेत, की समाजसेवक आहेत की दुकानदार आहेत की राजकारणी? बाबा रामदेव आहेत तरी कोण? कुणी सांगेल का? (बाबांकडे तरी ह्या प्रश्नाचे उत्तर आहे काय?) उपक्रमी सांगतील अशी अपेक्षा आहे.

आणि असेच प्रश्न इतर बाबांबद्दल पडत असल्यास तेही सांगावे.

या बाबाच्या मुसक्या वेळीच का बंधू नयेत?

Tuesday, May 17, 2011

आज जे आकलनाबाहेर आहे, त्यातलेच काही उद्या आत असेल

"देव म्हणजे कोण? देव म्हणजे काय?
देव म्हणजे हे का? देव म्हणजे ते का?"
"देव म्हणजे हे नव्हे. देव म्हणजे तेही नव्हे.
...तर्काच्या कसोटीवर जो कार्यकारणभाव स्पष्ट करता येतो, तो देव नक्कीच नव्हे.
सध्याच्या आकलनानुरूप जे स्पष्ट करता येत नाही, तिकडे देव असू शकतो."
"म्हणजे असेलच."
"असंही म्हणता येणार नाही.
संपूर्ण अतर्क्यापासून सुरू झालेला प्रवास आज इथवर आला आहे.
तर्क्य रोज वाढते आहे, अतर्क्य रोज घटते आहे."
"म्हणजे नेहमीच काहीतरी अतर्क्यसे उरेलच."
"तसे काही उरलेच नाही, असे तर्काला सिद्ध करावेच लागेल."
"असे कधी होईल?"
"ज्याचा कार्यकारणभाव मला कधीच स्पष्ट करता येणार नाही,
जे मला कधीच समजून घेता येणार नाही,
असे मानवी बुद्धिमत्तेच्या पल्याड ह्या जगात काहीतरी आहे,
ह्या धारणेचा समूळ लय होईल तेव्हा."
"हा माज आहे. मानवाच्या आकलनाबाहेरही काही असेलच - जसा की देव"
"अतर्क्याच्या मागे असणाऱ्या अशा अद्भुत शक्तींचं अस्तित्त्व
तुमच्या बुद्धिमत्तेचं फलित आहे, ते तुमच्या आकलनाबाहेर कसं असेल?"
"अं?"
"मृगासनावर बसून उपासना करणारा मनुष्येतर प्राणिवर्य पाहण्यात नाही.
वाघाला बोकडाचा बळी दगडावर चढवताना कुणी पाहिल्याचे ऐकिवात नाही.
देवाच्या अस्तित्त्वावर इतका ठाम विश्वास असणारा दुसरा प्राणी ऐकिवात नाही.

आज जे आकलनाबाहेर आहे, त्यातलेच काही उद्या आत असेल.
जे आत आहे, त्याला ते सुधारेल, अधिक सुस्पष्ट करेल.
आकलनाच्या कक्षा नित्य नूतनाचा स्वीकार करत सनातन वाढत आहेत.
ह्या विस्ताराला क्षय व लय नाही,
विस्ताराच्या अंताचे भय नाही
कारण, विस्ताराच्या अंतापलीकडे काही असणे संभवत नाही
उत्पत्ती-स्थिती-लयाच्या चक्रातून ते मुक्त आहे.
हे शाश्वत आहे.

सध्या आपले नसणे आकलनीय आहे, आपले असणे संदिग्ध आहे
पण तसे उद्या असेलच असे नाही.
ते तसे उद्या नसावे, ह्यासाठी हे ध्यानात घेतले पाहिजे की
आपण आज आहोत तसे उद्या नसणार,
आपली बुद्धी धारण करणारा हा देह पुन्हा नसणार,
जर संक्रमित व जतन केली नाही, तर ही बुद्धीही उद्या नसणार.
तिच्या संक्रमणाची व जतनाची
तसे करू शकणार्‍या प्रत्येक मानवाच्या,
म्हणजे अर्थातच सर्वच जन्माला येणार्‍या माणसांच्या अंतापर्यंत कल्याणाची
व पर्यायाने स्वहस्तेच हिंसेने युद्धून तिला आपल्यासह नष्ट न करण्याची
सामूहिक जबाबदारी आपल्यावर आहे."

आज बुद्ध जयंती !! बुध्द जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा !!!!

Monday, May 16, 2011

भुजबळ आणि नरके चालते व्हा !

हरी नरके नावाचा एक तथाकथित विचारवंत छगन भुजबळ यांच्याकडून सुपारी घेऊन सध्या अकलेचे तारे तोडत आहे. काही चंबूगबाळे या नरकेची री ओढू लागले आहेत. घरात नाही पीठ, कशाला हवे विद्यापीठ असे म्हणून दलितांना हिणवणारे, दलितांच्या स्पर्शाने हुतात्मा चौक बाटला अशी आरोळी ठोकून त्याचे गोमुत्राने शुद्धीकरण करणारे आणि नथूरा...म गोडसेचे पुतळे उभारू म्हणणारे छगन भुजबळ उपमुख्यमंत्रीपद जाताच कासावीस झाले आहेत. भुजबळ साहेबांना आता मराठे नकोसे झाले आहेत. मराठ्याशिवाय भुजबळांचे काहीच अस्तित्व नाही. पुतण्याच्या नाशिक मधल्या विजयासाठी याच भुजबळ साहेबांनी मराठ्यांचे पाय धरले होते. स्वताच्या ताकदीचा भुजबळ साहेबांना विसर पडला आहे. चालते व्हा असा संदेश मिळूनही भुजबळ साहेब अजून घड्याळाकडेच आहेत. आता हेच भुजबळ साहेब हरी नरकेसारख्या बाजारबुणग्यांना सोबत घेऊन आपली घुसमट काढण्याचा प्रयत्न करू लागले आहेत? हरी नरके कोण? त्याने काय दिवे लावले? वय लपउन त्याने कशी नोकरी मिळवली? कुठे आणि कोणासोबत मुक्काम ठोकले? त्याचे काही साथीदार काय करतात? दारू ढोसून कोणी तुरुंगाची हवा खाल्ली ? याचा पर्दाफाश लवकरच...

Sunday, May 15, 2011

चलो, न्युयॉर्क !!

मित्रांनो, न्युयॉर्क येथील Briarcliffe College (The Queens ) मध्ये येत्या नोव्हेंबर महिन्यात आंतरराष्ट्रीय "whole view " परिषद होत आहे. या परिषदेसाठी भारतातील आठ जनांची निवड झाली आहे. या आठ जणांमध्ये माझाही समावेश करण्यात आला आहे. मानव संसाधन विकास मंत्रालयातर्फे ही निवड करण्यात आली आहे. जम्मू -काश्मीरचे मुख्यमंत्र...ी उमर अब्दुल्ला, खा. सचिन पायलट, खा.ज्योतिरादित्य शिंदे, मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या अल्पना गुप्ता, सतीन्देरसिंघ सोधी, सारा अमीन आणि शुभावना दत्ता अशी आमची टीम असणार आहे. आम्हाला विषय देण्यात आला आहे की, जागतिक दहशतवादाकडे आजचा तरुण कोणत्या दृष्टीकोणातून पाहतो? २१ देशातील तरुण या परिषदेमध्ये सहभागी होणार आहेत. तब्बल ८ दिवसांची ही महाचर्चा आहे. जगाला जाणून घेण्याची आणखी एक संधी मला मिळाली आहे. मित्रांनो, तुम्हा सर्वांच्या, माझ्या कुटुंबियाच्या सदिच्छा माझ्या पाठीशी आहेतच असे मी समजतो.