नवीन महात्मा तयार करण्याचा खटाटोप !!!
'टीम अण्णा' मध्ये अण्णा हजारे नावाचा आधीच एक स्वयंघोषित महात्मा आहे...आता सध्या मिनी महात्मा असलेला अरविंद केजरीवाल नावाचा आणखी एक महात्मा तयार होऊ घातला आहे ....अण्णा हजारे आणि देशातल्या माध्यमांचा यासाठी हातभार लागत असून महात्मा बनायला निघालेला केजरीवाल बलिदानाची भाषा करू लागला आहे ....शहीद भगतसिंग, सुखदेव, राजगुरू आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी देशासाठी जसे बलिदान दिले तसे बलिदान द्यायला मी जंतरमंतरवर आलो असल्याचे अकलेचे तारे केजरीवाल यांनी आज तोडले . लोकांनी टाळ्या वाजविल्या आणि माध्यमांनी हे सारे देशाला दाखविले ....मी म्हणेल तोच कायदा ..मी म्हणेल तेच विधेयक ...मी म्हणेल तसेच लोकपाल हा अण्णा हजारे यांचा कित्ताच अरविंद केजरीवाल पुढे गिरवू लागले आहेत...अण्णा हजारे हे केवळ आता बुजगावणे म्हणून उरलेले दिसत आहेत ...अण्णा यांच्या नावाचा आधार घेत अरविंद केजरीवाल, किरण बेदी आणि इतर मंडळी मोठी होऊन आता अण्णांच्या डोक्यावरही वाटाण्याच्या अक्षता टाकू लागले आहेत ....केजरीवाल यांनी जंतरमंतर वर केलेली नाटके आणि त्यांनी अण्णा हजारे यांच्या उपस्थितीत केलेली बेताल विधाने ही खूप चिंताजनक आहेत. तरीही अण्णा आणि देशातली माध्यमे त्याकडे दुर्लक्ष करत आहेत . ही खेदाची बाब आहे. अण्णांच्या उपस्थितीतच केजरीवाल यांच्याकडून सदस्यांचा उल्लेख चोर, दरोडेखोर असा केला गेला. मनिष सिसोदिया यांनी तर यापुढे एक पाउल पुढे टाकून संयुक्त जनता दलाचे नेते शरद यादव यांच्याविषयी ‘चोर के दाढीमे तिनका’ अशी टिप्पणी केली. टीम अण्णाने असंसदीय आणि अवमानकारक भाषेत लोकप्रतिनिधींवर केलेली वैयक्तिक टीका एक वेळ क्षम्य असली तरी संसदेवर होणारीकधीच क्षम्य असू शकत नाही ...बाळासाहेब ठाकरे यांनी टीम अण्णाचा उल्लेख ‘उडाणटप्पूंची टोळी’ असा केला होता. तो सार्थ ठरवण्याची जबाबदारी टीम अण्णाने पार पाडली आहे. आपण दिलेला लोकपाल विधेयकाचा मसुदा जसा आहे तसाच संमत व्हावा हा टीम अण्णाचा हट्ट आहे. संसदेचे सदस्य काय किंवा टीम अण्णा काय दोघेही या प्रकारातून आपापला कंड शमवून घेत आहेत असा जनतेचा समज झाला तर तो चुकीचा म्हणता येणार नाही.

No comments:
Post a Comment