दुसऱ्या स्वातंत्रलढ्याची घोषणा देत अण्णा हजारे आणि त्यांच्या टीमने ज्या मागण्यांसाठी उपोषण केले त्या मान्य होण्यापूर्वीच उपोषणाचे नाटक गुंडाळणार असल्याचे जाहीर केले आहे ... उपोषणाची घोषणा करत असताना अण्णा हजारे यांनी नवीन राजकीय पर्याय देण्याची घोषणा केली . ही घोषणा म्हणजे अण्णा हजारे यांच्या जन आंदोलनाने ओढवून घेतलेला आत्मघात आहे...अण्णा निवडणूक प्रक्रियेतून निवडून आलेले जनप्रतिनिधी नाहीत व त्यामुळे
त्यांना कायदा करण्याच्या प्रक्रियेत सहभागी होण्याचा घटनादत्त अधिकार
नाही. अण्णा हजारे हे घटनाबाह्य दबावतंत्र वापरत आहेत ...विचारांवर विश्वास असणाऱ्या त्यांच्या अनुयायांनी हे
लक्षात घेऊन आपल्या लढ्याची दिशा थोडी बदलायला हवी. निवडणूक प्रक्रियेतून
निवडून येण्याचा मार्ग पत्करायला हवा. आज अण्णांसारखे नेतृत्व
आहे. त्यांनी व्यापक जनहितासाठी भ्रष्टाचाराविरोधात आंदोलन कधीच
छेडले आहे; पण ते पुरेसे नाही. राजकीय व्यवस्थाच बदलण्यात आपण पुढाकार
घ्यायला हवा. अण्णा टीम; तसेच किरण बेदी आदी लोकांनी एकत्र येऊन राष्ट्रीय
पातळीवर राजकीय पक्षाची स्थापना करून ग्रामपंचायतीपासून ते
लोकसभेपर्यंतच्या सर्व निवडणुकांमध्ये सहभागी होऊन जनतेसमोर जावे...अशी भूमिका मी सुरुवातीपासून मांडत आलो आहे ...आज अण्णा आणि त्यांची टीम राजकीय पर्याय देण्याची भाषा करू लागला आहे. मात्र मिडीयाला हाताशी धरून जन आंदोलन करणे आणि प्रत्यक्षात राजकीय कुरुक्षेत्रावर बाजी मारणे यात खूप फरक आहे . हे टीम अण्णाला लवकरच समजेल .गेल्या सोळा महिन्यांपासून टीम अण्णाच्या राजकीय महत्वाकांक्षा वाढल्या होत्या . त्या कधीच लपून राहिलेल्या नव्हत्या . अण्णांच्या आंदोलनाच्या दोऱ्या दोऱ्या ज्यांच्या हातात आहेत त्यांनीच आता हा आत्मघात घडवून आणला आहे. भ्रमनिरास, निराशा, शल्य सलत गेले , अखेर टीम अण्णाने आत्मघात ओढवून घेतला. ... हा वैचारिक गुंता न सुटणं हाच आत्मघात ठरला....भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाला मिळालेल्या प्रतिसादातून चळवळींचे
राजकारण करू पाहणाऱ्यांना नक्कीच हुरूप आला असेल. राजकीय पक्षांच्या पलीकडे
राजकारण चालणं हे लोकशाहीच्या विस्ताराचं लक्षण आहे. अशा चळवळींनी राजकारण
जास्त व्यापक बनू शकते असे नाही . अण्णा हजारे यांनी दुसऱ्या क्रांतीची भाषा केली आहे . जयप्रकाश नारायण यांनीही याया पूर्वी संपूर्ण क्रांतीची घोषणा केली होती . जयप्रकाश नारायण यांनी इंदिरा गांधी यांच्या भ्रष्ट कारभाराविरुद्ध देशाला उभे केले, रान पेटविले; पण त्यांनी देशाची घटना व कायदा बदला असे कधीच सांगितले नाही. अण्णांनी तर संसद हा चोरांचा अड्डा आहे असे म्हटले ....जयप्रकाश नारायण यांनी कायदा व घटनेच्या चौकटीतच त्यांनी इंदिरा गांधी व त्यांच्या कॉंग्रेस सरकारविरुद्ध युद्ध पुकारले व इंदिरा गांधींचा दारुण पराभव केला. जयप्रकाश यांच्यावेळी ‘मीडिया’ आजच्याइतका प्रभावी नव्हता. चोवीस तास ‘उपोषणांना’ प्रसिद्धी देणारी टीव्ही चॅनल्स नव्हती. वृत्तपत्रेही मर्यादित होती. जी होती ती इंदिरा गांधींची अंकित होती. तरीही जयप्रकाश नारायण यांनी देशातील जनतेला लढ्यासाठी एकत्र आणले. अण्णा हजारे हे करू शकतील का ? टीम अण्णांच्या नव्या भूमिकेवर अद्याप भाजपने तोंड उघडलेले नाही . बाबा रामदेव सुद्धा मिठाची गुळणी घेऊन बसला आहे . टीम अण्णाचे जहाज भरकटले आहे.
Thursday, August 2, 2012
Wednesday, August 1, 2012
नवीन महात्मा तयार करण्याचा खटाटोप !!!
'टीम अण्णा' मध्ये अण्णा हजारे नावाचा आधीच एक स्वयंघोषित महात्मा आहे...आता सध्या मिनी महात्मा असलेला अरविंद केजरीवाल नावाचा आणखी एक महात्मा तयार होऊ घातला आहे ....अण्णा हजारे आणि देशातल्या माध्यमांचा यासाठी हातभार लागत असून महात्मा बनायला निघालेला केजरीवाल बलिदानाची भाषा करू लागला आहे ....शहीद भगतसिंग, सुखदेव, राजगुरू आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी देशासाठी जसे बलिदान दिले तसे बलिदान द्यायला मी जंतरमंतरवर आलो असल्याचे अकलेचे तारे केजरीवाल यांनी आज तोडले . लोकांनी टाळ्या वाजविल्या आणि माध्यमांनी हे सारे देशाला दाखविले ....मी म्हणेल तोच कायदा ..मी म्हणेल तेच विधेयक ...मी म्हणेल तसेच लोकपाल हा अण्णा हजारे यांचा कित्ताच अरविंद केजरीवाल पुढे गिरवू लागले आहेत...अण्णा हजारे हे केवळ आता बुजगावणे म्हणून उरलेले दिसत आहेत ...अण्णा यांच्या नावाचा आधार घेत अरविंद केजरीवाल, किरण बेदी आणि इतर मंडळी मोठी होऊन आता अण्णांच्या डोक्यावरही वाटाण्याच्या अक्षता टाकू लागले आहेत ....केजरीवाल यांनी जंतरमंतर वर केलेली नाटके आणि त्यांनी अण्णा हजारे यांच्या उपस्थितीत केलेली बेताल विधाने ही खूप चिंताजनक आहेत. तरीही अण्णा आणि देशातली माध्यमे त्याकडे दुर्लक्ष करत आहेत . ही खेदाची बाब आहे. अण्णांच्या उपस्थितीतच केजरीवाल यांच्याकडून सदस्यांचा उल्लेख चोर, दरोडेखोर असा केला गेला. मनिष सिसोदिया यांनी तर यापुढे एक पाउल पुढे टाकून संयुक्त जनता दलाचे नेते शरद यादव यांच्याविषयी ‘चोर के दाढीमे तिनका’ अशी टिप्पणी केली. टीम अण्णाने असंसदीय आणि अवमानकारक भाषेत लोकप्रतिनिधींवर केलेली वैयक्तिक टीका एक वेळ क्षम्य असली तरी संसदेवर होणारीकधीच क्षम्य असू शकत नाही ...बाळासाहेब ठाकरे यांनी टीम अण्णाचा उल्लेख ‘उडाणटप्पूंची टोळी’ असा केला होता. तो सार्थ ठरवण्याची जबाबदारी टीम अण्णाने पार पाडली आहे. आपण दिलेला लोकपाल विधेयकाचा मसुदा जसा आहे तसाच संमत व्हावा हा टीम अण्णाचा हट्ट आहे. संसदेचे सदस्य काय किंवा टीम अण्णा काय दोघेही या प्रकारातून आपापला कंड शमवून घेत आहेत असा जनतेचा समज झाला तर तो चुकीचा म्हणता येणार नाही.

Sunday, March 4, 2012
मोदी मॅनिया'चे परदेशात धिंडवडे !!!
देशात ज्या नरेंद्र मोदी यांचे पोवाडे गायले जात आहेत त्याच मोदींनी परदेशात धर्माचे आणि देशाचेही धिंडवडे काढले आहेत . जिवंत माणसांच्या कत्तली करून गुजरातमध्ये सत्तेचा मोक्ष मिळविणाऱ्या नरेंद्र मोदी यांची प्रतिमा विकासपुरुष म्हणूनच नाही तर चक्क ' भगवान ' म्हणून रंगविली जात आहे. संघ परिवार आणि संघाच्या दावणीला बांधली गेलेली प्रसारमाध्यमे याबाबतीत अग्रभागी आहेत . अनिल अंबानी आणि मित्तल परिवाराने देशाचा भावी पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांचा जयघोष केला आणि भांडवलदारांच्या तिजोरीवर पोसणाऱ्या भाजपच्या पक्षप्रमुखांनी म्हणजे नितीन गडकरी यांनीही मोदी हेच कसे पतंप्रधानपदासाठी लायक आहेत म्हणून तुणतुणे वाजवायला सुरुवात केली . अटलबिहारी वाजपेयी यांना तर भाजपने जिवंतपणीच 'हुतात्मा' बनवून टाकले आहे. आपणच खरे देशभक्त आहोत म्हणून टेंभा मिरविणारे संघ ,भाजप आणि त्यांचे चेलेचपाट अटलजींनी मोदींना राजधर्म पाळण्याचा सल्ला दिला होता हे जाणीवपूर्वक विसरले आहेत . अटलजींनी मोदी हा देशावरचा कलंक आहे असे पण म्हटले होते , याचाही संघ परिवाराला विसर पडला आहे . मीडियाला 'मोदी मॅनिया' कधीच पछाडले आहे. गुजरातमधील धार्मिक स्वातंत्र्याचे पुनरुज्जीवन करण्याचे आवाहन करणारा ठराव अमेरिकेच्या संसदेत सादर करण्यात आला आहे. गुजरातमध्ये झालेल्या दंग्यांना 10 वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर या आठवड्याच्या सुरुवातीला किथ एलिसन यांनी हा बंधनकारक नसलेल्या श्रेणीतील ठराव सभागृहासमोर मांडला. कोणत्याही अनुमोदकाच्या पाठबळाशिवाय मांडलेला हा ठराव असून तो पुढील प्रक्रियेसाठी सभागृहाच्या परराष्ट्र व्यवहार समितीकडे पाठवण्यात आला आहे.
गुजरातमध्ये 2002मध्ये झालेल्या या दंग्यांमधील पीडितांना न्याय देण्यासाठी गुजरात सरकारने पुरेसे प्रयत्न केले नसल्याच्या अमेरिकेच्या गृह विभागाच्या मताशी सहमती दर्शवणारा हा ठराव आहे. गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या या दंग्यांमधील कथित सहभागासंदर्भात पत्रकार आणि मानवी हक्क संघटनांनी दिलेल्या वृत्तांबाबत या ठरावात चिंता व्यक्त केली आहे. तसेच आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्य कायद्यातील तरतुदींच्या आधारावर मोदी यांना 2005 साली अमेरिकेत येण्यासाठी व्हिसा नाकारल्याबद्दल प्रशंसा केली आहे.
अमेरिकेच्या संसदेत सादर झालेल्या या ठरावाचे इंडियन अमेरिकन मुस्लीम कौन्सिलने(आयएएमसी) एका निवेदनाद्वारे स्वागत केले आहे. अमेरिकेतील भारतीय समुदायाने आपापल्या स्थानिक प्रतिनिधींशी संपर्क साधावा व या ठरावाचे अनुमोदक बनण्याची त्यांना विनंती करावी, असे आवाहन आयएएमसीने केले आहे.
Subscribe to:
Posts (Atom)