माझी आई जशी ,वणव्यातील पक्षिणी
पेटला वणवा आपत्तीचा
छत्र उडाले सौभाग्याचे
फडफड फडफड फडफडली
तडफड तडफड तडफडली
जशी वणव्यातील पक्षिणी ||
पेटला वणवा आपत्तीचा
छत्र उडाले सौभाग्याचे
फडफड फडफड फडफडली
तडफड तडफड तडफडली
जशी वणव्यातील पक्षिणी ||
वणवा विझला ,सारे खाक झाले
राख झाली पतीविण आयुष्याची
तरी भस्म कपाळी लेवून, सरसावली
चिमणी चारा शोधण्यासाठी
जशी लेकुरवाळी पक्षिणी ||
राख झाली पतीविण आयुष्याची
तरी भस्म कपाळी लेवून, सरसावली
चिमणी चारा शोधण्यासाठी
जशी लेकुरवाळी पक्षिणी ||
कष्ट कष्टली वणवण फिरली
झीज झीज झिजली मृत यातना या , जिवंतपणी
त्यागाच्या आहुतीत ,धूप तिचा सुगंधीमयी
मातृवात्साल्यासाठी , एका पायावर उभी ही , दिव्यमयी पक्षिणी ||
झीज झीज झिजली मृत यातना या , जिवंतपणी
त्यागाच्या आहुतीत ,धूप तिचा सुगंधीमयी
मातृवात्साल्यासाठी , एका पायावर उभी ही , दिव्यमयी पक्षिणी ||